गावाची ग्रामपंचायत

पुळास हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. पुळास हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे 32 किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे 47 किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये 7 वाड्या आहेत. गावची लोकसंख्या 701 इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये दोन प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये 8 कार्यकारिणी सदस्य, ग्रामसेवक व 2 कर्मचारी आहेत.